नवी दिल्ली,
Gold prices fall on Padwa दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घट झाली असून, खरेदीसाठी आज सुवर्णसंधी आहे. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोनं खरेदी करण्यासाठी १,२७,२०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घट दिसून आली आहे. याशिवाय, १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात २,५४० रुपयांची घट झाली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे आज खरेदीदारांचा कल वाढला असून, अनेक तरुणांना पाडव्यानिमित्त आपल्या प्रिय बायकोसाठी सोनं गिफ्ट देण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. १ किलो चांदीच्या दरात २००० रुपयांची घट झाल्यामुळे आज १ किलो चांदी खरेदी करण्यासाठी १,६२,००० रुपये खर्च करावे लागतील. १ ग्रॅम चांदीचे दर ४२ रुपयांनी कमी झाले असून, त्यामुळे चांदी खरेदी करण्याची संधी देखील आज उपलब्ध आहे. दर घटल्यामुळे सोनं आणि चांदी खरेदीसाठी आजचा दिवस खरेदीदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरला आहे.