नागपूर,
golden-gang-traces-nagpur हावडा-मुंबई मेलमधून सव्वादोन कोटींचे सोने उडविणारी गोल्डन गँग ट्रेस करण्यात रेल्वेच्या तपास यंत्रणांना अखेर यश आले. अशा प्रकारच्या अनेक धाडसी चोर्या, लुटमार्या या टोळीने केल्या असून, मराठवाडा, आंध्र प्रदेशमधील तपास यंत्रणाही या टोळीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली आहे.

रविवारी हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसमधून सराफा व्यापारी किशोर वर्मा (वय ४४, रा. गणपतीनगर, रा. जळगाव) प्रवास करीत होते. त्यांच्याजवळ २.११ कोटी रुपये किमतीचे सोने बडनेरा रेल्वेस्टेशन जवळ चोरट्यांनी हे सोने लंपास केले. golden-gang-traces-nagpur वर्मा यांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर नागपूर जीआरपी क्राइम ब्रँचसह रेल्वेशी संबंधित तपास यंत्रणा या चोरीच्या तपासात लागले होते. रेल्वेच्या तपास यंत्रणांना एक धागा मिळाला. त्याआधारे पश्चिम महाराष्ट्रात विखुरलेल्या या टोळीला ट्रेस करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. अत्यंत सराईत असलेली टोळी सव्वादोन कोटींच्या सोन्यावर हात मारल्यानंतर शहराबाहेर मौजमजा करीत होते. या टोळीवर विदर्भासह, छत्रपती संभाजीनगर, आंध्र आणि अन्य काही ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.