दुखापतीनंतर हार्दिक पांड्या पुनरागमनाच्या तयारीत!

22 Oct 2025 16:44:41
मुंबई
hardik pandya भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. आशिया कपमध्ये झालेल्या दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर राहिलेला हार्दिक सध्या बंगळुरूमधील बीसीसीआयच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेत आहे. त्याचं हे पुनरागमन भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
 

hardik pandya 
हार्दिक hardik pandya  पांड्याला आशिया कपदरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात क्वॉड्रिसेप्स स्नायूमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर तो पाकिस्तानविरुद्धच्या निर्णायक लढतीत खेळू शकला नाही आणि पुढे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वनडे व टी२० मालिकांमधूनही त्याला वगळण्यात आलं. ही दुखापत गंभीर असल्याचं सांगितलं गेलं असलं तरी सध्या त्याच्या स्थितीत सुधारणा होत असल्याचं बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात येत आहे.दिवाळीच्या कालावधीत काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर हार्दिकने २२ ऑक्टोबरपासून पुन्हा प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. रिहॅबिलिटेशनदरम्यान बीसीसीआयच्या तज्ञ डॉक्टरांच्या आणि प्रशिक्षकांच्या सततच्या देखरेखीखाली त्याचा फिटनेस प्रोग्रॅम राबवला जात आहे. सध्या तरी त्याच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.भारतीय संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे, जिथे तीन टी२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, त्याआधी हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त झाला, तर त्याला टी२० संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी टी२० वर्ल्ड कप आणि २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघबांधणी करत असलेल्या भारतीय संघासाठी हार्दिकसारख्या अष्टपैलू खेळाडूचं पुनरागमन महत्त्वाचं ठरणार आहे.
 
 
 
भारतीय संघाचे hardik pandya  फलंदाज प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या संतुलनावर परिणाम होत असल्याचं स्पष्टपणे कबूल केलं. “हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू खेळाडू नसणं ही संघासाठी मोठी उणीव आहे. तो फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही भूमिकांमध्ये महत्त्वाचा ठरतो. अशा खेळाडूची जागा सहजपणे कुणीही घेऊ शकत नाही,” असं त्यांनी नमूद केलं.दरम्यान, हार्दिकच्या अनुपस्थितीत नवा खेळाडू नितीश कुमार याला काही संधी देण्यात आल्या आहेत, मात्र त्याच्याकडून हार्दिकची जागा भरून काढण्याची अपेक्षा तात्काळ करणं कठीण आहे, असंही संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच हार्दिकचं वेळेत पुनरागमन होणं हे संघासाठी अत्यंत आवश्यक आहे.सध्या तरी बीसीसीआयच्या अकादमीत हार्दिक आपला फिटनेस उंचावण्यासाठी मेहनत घेत आहे. येत्या काही आठवड्यांत त्याच्यावर फिटनेस चाचण्या घेतल्या जाणार असून, त्यात तो यशस्वी ठरल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याचं पुनरागमन जवळपास निश्चित मानलं जात आहे.भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी ही नक्कीच आशादायक बातमी आहे. मैदानावर आपल्या आक्रमक शैलीने सामन्याचे चित्र बदलून टाकणारा हार्दिक पुन्हा एकदा निळ्या जर्सीत झळकणार, याची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागली आहे. 
Powered By Sangraha 9.0