बुलढाणा,
harshvardhan sapkal आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महाविकास आघाडी सोबत असलेली ठाकरे सेना, राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांच्यात जागा वाटपात होत असलेली चूरस लक्षात घेता. स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्या या भूमिकेमुळे निवडणूकीपूर्वीच आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे व उद्धव ठाकरें सोबत काँग्रेस जाणार नाही असा दावा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला होता. त्यावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सेना-मनसेसोबत जाऊ नये अशी नेते कार्यकर्त्यांची भावना आहे. स्थानिक नेतृत्वासोबत बसून यावर चर्चा होईल. ज्याक्षणी निवडणूक जाहीर होईल तेव्हा याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या पीडित शेतकर्यांना अद्याप मदत मिळाली नाही. महायुती सरकारवर निशाणा साधला. .