थोडक्यात बचावले! शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

22 Oct 2025 19:30:58
हिंगणघाट,
short circuit fire तालुयातील वडनेर येथील शिल्पा दांडेकर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात दांडेकर यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाल्याने सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवार २१ रोजी मध्यरात्री घडली.
 

short circuit fire 
मिळालेल्या माहितीनुसार, गावात सर्वत्र लक्ष्मी पुजनाचा उत्सव साजरा झाला. रात्री १२ वाजेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात फटायांची आतषबाजी सुरू होती. त्यानंतर दांडेकर कुटुंबीय झोपी गेले. अशातच मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने दांडेकर यांच्या घराला आग लागली. वेळीच संपूर्ण कुटुंबीय घराबाहेर पडल्याने थोडयात बचावले. पण बघता-बघता आगीने घरातील साहित्याला कवेत घेतले. आगीत घरातील डाळ, गहू, तांदूळ, कपडे, कुलर, फ्रिज, दिवाण, कपाट, महत्त्वाची कागदपत्रं, रोख २० हजार रुपये तसेच इतर जीवनावश्यक साहित्य जळून राख झाल्याने दांडेकर कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर दांडेकर कुटुंबीय व नागरिकांनी पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळविले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. माहिती मिळताच खा. अमर काळे, राकाँ शप गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी तातडीने दांडेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
Powered By Sangraha 9.0