पत्नीच्या हत्याकांडात पतीची जन्मठेप कायम

22 Oct 2025 17:03:30
अनिल कांबळे
 
नागपूर,
Husband's life sentence upheld काैटुंबिक वादातून पत्नीच्या डाेक्यावर कु-हाडीने हल्ला करीत ठार मारणा-या पतीला कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली हाेती. मात्र, ‘ताे मी नव्हेच’ अशी भूमिका घेत आराेपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले हाेते. मात्र,सत्र न्यायालयाने दिलेला निकाल याेग्य ठरवत न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती वाय. जी. खाेब्रागडे यांनी आराेपी पती परशूराम शंकर उईके याचे अपील ेटाळून लावले. हा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित हाेता.
 
 
Husband
 
आराेपी परशूराम ऊईके (32) हा मूळचा मध्यप्रदेशातील असून, ताे पत्नी गजरी उईके (23) आणि अडीच वर्षांच्या मुलीसह अमरावती जिल्ह्यातील माेर्शी येथील पारडी गावातील एका शेतात मजूर म्हणून काम करत हाेता. शेतमालकाने त्यांना राहण्यासाठी शेतातच एक घर दिले हाेते. 21 ऑगस्ट 2018 राेजी दुपारी 2 वाजता, शेतमालकाने परशूराम आणि पत्नी गजरी यांना माेर्शी बाजारात पाहिले हाेते. मात्र, दुस-या दिवशी (22 ऑगस्ट) सकाळी 7 वाजता शेतमालक शेतातील घरी गेला असता, त्याला गजरी रक्ताच्या थाराेळ्यात मृतावस्थेत आढळली. तिच्या डाेक्यावर गंभीर जखमा हाेत्या. त्यावेळी परशूराम आणि त्याची मुलगी घरी नव्हते. शेतमालकाने तत्काळ माेर्शी पाेलिसांना माहिती दिली की, परशूरामनेच पत्नीचा खून करून मुलीसह पळ काढला आहे. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात ’डाेक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे रक्तस्त्राव आणि धक्क्याने’ गजरीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
उच्च न्यायालयाचे निरीक्षण
सत्र न्यायालयाने परशूरामला कलम 302 (हत्या) अंतर्गत दाेषी ठरवून जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली हाेती. या शिक्षेविराेधात परशूरामने उच्च न्यायालयात अपील केले हाेते. न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ही शिक्षा कायम ठेवली. कारण घटनेनंतर परशूरामने त्याच्या अडीच वर्षांच्या मुलीला एका नातेवाईकाच्या (साक्षीदार दशरथ उईके) घरी साेडले. त्याने आपल्या पत्नीबद्दल काेणालाही काहीही सांगितले नाही आणि तेथून ताे निघून गेला. पत्नीचा खून झालेला असताना पतीचे हे वर्तन अत्यंत संशयास्पद हाेते.
 
न्यायवैद्यक पुरावा भक्कम
पाेलिसांनी परशूरामला अटक केल्यानंतर, त्याने लपवून ठेवलेली कु-हाड काढून दिली. न्यायवैद्यक प्रयाेगशाळेच्या अहवालानुसार, जप्त केलेल्या कुèहाडीवर मानवी रक्त आढळले आणि ते रक्तगट ’एबी’ हाेते. मयत गजरीचा रक्तगट देखील ’एबी’ हाेता. कलम 106 (पुरावा कायदा) नुसार न्यायालयाने स्पष्ट केले की, ही हत्या घरात घडली, जिथे फक्त आराेपी, त्याची पत्नी आणि त्यांची लहान मुलगी राहत हाेती. अशा बंद ठिकाणी पत्नीचा मृत्यू कसा झाला, याचे स्पष्टीकरण देण्याची कायदेशीर जबाबदारी पतीवर (आराेपीवर) हाेती. मात्र, परशूरामने याबाबत माैन बाळगले. या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी आराेपीचा गुन्हा नि:संशयपणे सिद्ध करते, असे निरीक्षण नाेंदवत न्यायालयाने आराेपीचे अपील ेटाळून लावले आणि त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. सरकारर्ते अ‍ॅड. सागर अशीरगडे यांनी बाजू मांडली.
Powered By Sangraha 9.0