मुंबई,
ladali bahin yojna news लाडक्या बहिणींना भाऊबीज लवकरच मिळणार, अशी मोठी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. दिवाळीच्या पाडव्यापासून सुरू झालेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वांना शुभेच्छा देत लाडकी बहीण योजनेबाबतही अपडेट दिला. योजनेत काही बदल करण्यात आले आहेत; आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले असून निकष पूर्ण न करणाऱ्या बहिणींना अपात्र केले जाऊ शकते.
एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असून बहिणींना भाऊबीजवर लाभ मिळणार आहे. त्यांनी सणाच्या शुभेच्छांसह सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सुखाचा वर्षाव होवो, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या पक्षासाठी फडकेल अशी आशा व्यक्त केली. दरम्यान, योजनेतील बदलांमुळे काही महिलांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार योजना सुरू राहणार आहे आणि भाऊबीजची भेट लाडक्या बहिणींना मिळणार आहे.