जिल्ह्यात प्रथमच महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना

22 Oct 2025 18:46:12
यवतमाळ,
Mahalaxmi Murti जिल्ह्यात नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सर्वत्र आई जगदंबेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. मात्र दिवाळीच्या मंगल पर्वावर यंदा प्रथमच लक्ष्मीमातेचे सार्वजनिक आगमन झाले आहे. मूर्तिकार कल्पेश जैन यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या व प्रज्योत चौकडे, एमएच29 मित्र परिवार यांनी पुढाकार घेतला आहे.
 
 
 
Mahalaxmi Murti
या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. शहरातील दर्डानगर, पाण्याच्या टाकीजवळ महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही दिव्य मूर्ती शहरवासींचे लक्ष वेधत आहे.
Powered By Sangraha 9.0