नवी दिल्ली,
Muslim family celebrating Diwali दिवाळीच्या सणात फटाक्यांच्या वापरावरून देशभरात वाद सुरू असतानाच, सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका मुस्लिम कुटुंबाने गुप्तपणे दिवाळी साजरी केल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले उड्डाणपुलावर फटाके फोडत आनंद साजरा करताना दिसतात. महिलेनं पारंपरिक मुस्लिम पोशाख परिधान केला असून, सर्वजण चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसतात.
हा प्रसंग पाहून लोकांच्या मनात एकच विचार उमटला तो म्हणजे 'हा आहे खऱ्या भारताचा चेहरा' विविधतेत एकतेचं जिवंत उदाहरण ठरलेला हा व्हिडिओ गंगा-जमुना संस्कृतीची झलक दाखवतो. असा अंदाज आहे की हे कुटुंब समाजातील परंपरागत दबावामुळे उघडपणे दिवाळी साजरी करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी उड्डाणपुलावर हा आनंद अनुभवला. या व्हिडिओबद्दल लोकांनी म्हटले आहे की, धर्म कोणताही असो, सण साजरा करण्याचा आनंद सर्वांचा असतो. हा आहे एकतेचा, सहजीवनाचा आणि भारतीय संस्कृतीचा खरा सण.