ओपनएआयचा अ‍ॅटलास ब्राउझर: गुगल क्रोमला थेट आव्हान

22 Oct 2025 11:38:48
नवी दिल्ली,
OpenAI's Atlas Browser ओपनएआयने गुगल क्रोमला थेट आव्हान देत अ‍ॅटलास नावाचा नवीन एआय-चालित वेब ब्राउझर लाँच केला आहे. हा ब्राउझर चॅटजीपीटीभोवती तयार करण्यात आला असून त्यामध्ये ‘एजंट मोड’चा समावेश आहे, ज्यामध्ये चॅटजीपीटी वापरकर्त्याच्या वतीने स्वतंत्रपणे वेबवर शोध घेते आणि परिणाम परत देते.
 
 

OpenAI 
 
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की अॅटलास ब्राउझर सध्या अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टमवर मोफत उपलब्ध असेल. मात्र, एजंट मोड फक्त चॅटजीपीटीच्या सशुल्क प्लस किंवा प्रो वापरकर्त्यांसाठी मर्यादित असेल. ऑल्टमनने पुढे म्हटले की लवकरच हा ब्राउझर विंडोज आणि मोबाइल डिव्हाइससाठीही उपलब्ध होईल, पण अद्याप तो सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
 
टेक उद्योगात २०२२ च्या उत्तरार्धापासूनच अॅमेझॉन, गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि एक्सएआयसारख्या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेत जोरदार स्पर्धा करत आहेत. या ब्राउझरच्या लाँचमुळे गुगलवर दबाव निर्माण होईल, असा विश्वास तज्ज्ञांचा आहे. OpenAI चे हे पाऊल एआयचा वापर इंटरनेट वापरकर्त्यांसाठी अधिक सहज आणि थेट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Powered By Sangraha 9.0