श्रीलंकेत विरोधी पक्षनेत्याची हत्या

22 Oct 2025 16:52:57
कोलंबो,
Opposition leader assassinated in Sri Lanka श्रीलंकेत बुधवारी एका धक्कादायक घटनेत विरोधी पक्षनेते लसांथा विक्रमेसेकेरा यांची त्यांच्या कार्यालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. देशाच्या इतिहासातील ही पहिली राजकीय हत्या आहे. ३८ वर्षीय विक्रमेसेकेरा हे वेलिगामा शहराचे कौन्सिल चेअरमन होते. ते त्यांच्या कार्यालयात मतदारांना भेटत असताना एका हल्लेखोराने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरने अनेक गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला आणि या हल्ल्यात इतर कोणीही जखमी झाले नाही. तपास सुरू करण्यात आला आहे, परंतु हत्येचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. या घटनेने श्रीलंकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
 
 

Opposition leader assassinated in Sri Lanka 
या वर्षी श्रीलंकेत हिंसक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, त्यापैकी बहुतेक ड्रग्ज टोळ्या आणि संघटित गुन्हेगारीशी जोडलेले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, १०० हून अधिक गोळीबाराच्या घटनांमध्ये किमान ५० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच राजकारण्याची हत्या आहे. गेल्या वर्षी सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेमुळे या सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Powered By Sangraha 9.0