बुलढाणा
police commemoration day दरवर्षीप्रमाणे यंदाही २१ ऑटोबर रोजी पोलीस स्मृती दिन उत्साहपूर्वक आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंगळवारी बुलढाणा जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी शहीद पोलीस जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलाचे निवृत्त अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शहीद जवानांची नावे वाचून दाखवण्यात आली आणि दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी परिसरातील पाहणी करून शस्त्र विषयी माहिती घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शहीद जवानांना सलाम करत भारत माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला