मुस्लिम कुटुंबाची सून आणि अभिनयातून माघार घेण्याचा निर्णय

22 Oct 2025 14:41:52
मुंबई,
pooja bedi नव्वदच्या दशकात बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेली पूजा बेदी ही आपल्या अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच अचानकपणे चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. यामागील कारण तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने स्पष्ट केलं. एका रुढीवादी मुस्लीम कुटुंबात सून म्हणून स्वीकारलं जाण्यासाठी तिला अभिनय क्षेत्राचा त्याग करावा लागल्याचं पूजाने सांगितलं.
 
 

pooja bedi  
पूजा बेदीने उद्योगपती फरहान फर्निचरवालाशी विवाह केला होता. विवाहानंतर नव्या कुटुंबातील सदस्यांना आपल्याबद्दल संकोच वाटू नये, याची तिने विशेष काळजी घेतली. “मी एका रुढीवादी मुस्लीम कुटुंबातून आलेल्या फरहानशी लग्न केलं. त्याचे कुटुंबीय सेटवर जाणाऱ्या सुनेला स्वीकारतील, असं या पृथ्वीवर घडणार नव्हतं,” असं ती म्हणाली.नव्वदच्या दशकातील फिल्म इंडस्ट्रीच्या वातावरणाचा उल्लेख करताना पूजा म्हणाली, “त्या काळात चित्रपटसृष्टीतील हिरो-हिरोइनच्या अफेअर्सविषयी अफवा, चर्चा आणि गॉसिप यांचा भडीमार असायचा. त्यामुळे अभिनय करणाऱ्या मुलीला ‘सेक्सी बहू’ किंवा ‘सेक्स सिम्बॉल बहू’ असा ठपका लागण्याची शक्यता होती, आणि ते कोणत्याही परंपरागत कुटुंबाला मान्य नव्हतं.”पूजाने स्पष्ट केलं की, अभिनयाच्या क्षेत्रात टिकून राहायचं असल्यास तिला संपूर्ण समर्पण आणि सन्मान देऊन काम करायचं होतं. मात्र, तिच्या नव्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे हे शक्य नव्हतं. “मी ठरवलं की जर काही करायचं असेल, तर ते मनापासून आणि आदराने करावं. त्यामुळे मी अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दोनच पर्याय होते — एकतर लग्नच करू नये किंवा मग कुटुंबासाठी अभिनय क्षेत्र सोडून द्यावं. मी दुसरा मार्ग निवडला,” असं पूजाने सांगितलं.
 
 
या निर्णयामुळे pooja bedi तिने आपल्या अनेक प्रोजेक्ट्सची साइनिंग रक्कम परत केली. “त्यावेळी मी कामसूत्र या जाहिरातीसाठी देखील आठपट अधिक पैसे नाकारले,” असा खुलासाही तिने केला.
 
 
पूजा आणि pooja bedi फरहान यांचा नंतर घटस्फोट झाला. त्यांना अलाया आणि ओमर ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही पूजा आणि फरहान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध कायम राहिले. फरहानने त्यानंतर आपल्या बालमैत्रिणीशी दुसरं लग्न केलं.पूजा बेदीने स्वतःच्या निर्णयाची पारदर्शकता आणि त्यामागील सामाजिक-सांस्कृतिक गुंतागुंतीचं चित्र अधोरेखित करत एक स्त्री म्हणून केलेल्या समजूतदार निवडीचं वास्तव मांडलं आहे. तिची ही कबुली नव्वदच्या दशकातील अभिनेत्रींच्या आयुष्यावर प्रकाश टाकते आणि त्या काळातील सामाजिक मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करते.
Powered By Sangraha 9.0