पुणे,
Punekar vs outsiders conflict महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शैक्षणिक तसेच आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर सध्या नव्या प्रकारच्या प्रादेशिक वादाच्या चाळीसात सापडलं आहे. ‘पुणेकर विरुद्ध बाहेरून आलेले’ असा भावनिक वाद सोशल मीडियावर उफाळला असून यामुळे पुण्याच्या शांततेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होत असल्याचे तज्ज्ञ आणि नागरिक सांगत आहेत.
पुणे हे शिक्षण, Punekar vs outsiders conflict रोजगार आणि व्यवसायासाठी देशभरातून तरुण-तरुणींना आकर्षित करणारे शहर आहे. मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘पुणेकर विरुद्ध बाहेरू आलेले’ अशा आशयाचे पोस्टर आणि मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या पोस्टरमध्ये खासकरून मराठवाडा आणि विदर्भसारख्या महाराष्ट्रातील प्रांतांतील मराठी लोकांना टार्गेट करण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुट्टीत Punekar vs outsiders conflict जे पुण्यातील विद्यार्थी व कामगार आपल्या गावाकडे गेले होते, त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करून “चालले, परत येऊ नका… शुभ दीपावली” अशा संदेशांनी चिडवण्यात आले. मात्र त्यानंतर परिस्थिती उलटली आहे. आता एका तरुणाने भर रस्त्यात पोस्टर दाखवत पुणेकरांकडून बाहेरून आलेल्यांना ‘हे आपलंही शहर आहे, कोणाच्या बापाची संपत्ती नाही’ अशा शब्दांत परत येण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टरची प्रत एका ‘@abhayanjuu’ या इन्स्टाग्राम युजरने शेअर केली आहे.या प्रकारामुळे पुण्याच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरातील विविध स्तरांवर या वादाचे निराकरण करणे गरजेचे आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या प्रादेशिक भेदभावाला विरोध व्यक्त केला आहे आणि पुणे हे विविधतेत एकतेचे उदाहरण असावे, असा संदेश दिला आहे.
विशेष म्हणजे, या वादामुळे फक्त बाहेरून आलेल्या लोकांनाच नाही तर मराठवाडा व विदर्भसारख्या राज्यातील प्रांतांतील मराठी लोकांनाही मनोवैज्ञानिक त्रास होत असल्याचेही समोर आले आहे. पुणेकर व बाहेरून आलेले यांच्यातील हा वाद नको असलेला सामाजिक तणाव वाढवू शकतो, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली आहे.शहरात असे वाद न वाढता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, समाजकार्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मतं तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत.पुण्याच्या या एकात्मतेला भेद देणारा हा वाद लवकरच मिटवला जावा, हीच अपेक्षा आहे.