'रोहित शर्मा बदले बदले लग रहे!'

22 Oct 2025 16:28:59
ऑस्ट्रेलिया
rohit sharma पर्थ वनडेमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या तगड्या दबावात असल्याची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. एडिलेड वनडेच्या पूर्वसंध्येला रोहितच्या वागणुकीत झालेला बदल, त्याचा एकाकीपणा आणि त्याच्याबाबत निवड समितीच्या हालचाली यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संधीच्या टप्प्यावर असल्याची शक्यता बोलली जाऊ लागली आहे.
 

rohit sharma 
प्रॅक्टिस सेशनदरम्यान rohit sharma  रोहित नेहमी सहकारी खेळाडूंशी संवाद साधत असतो, प्रसारमाध्यमांशी हास्यविनोद करतो, चाहत्यांनाही हात हलवून अभिवादन करतो. मात्र एडिलेडमधील सराव सत्रात रोहित पूर्णपणे गप्प होता. एकटा, गंभीर चेहऱ्याने नेट्समध्ये थोडीफार फलंदाजी करून तो लवकर मैदान सोडून गेला. ही परिस्थिती पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.याच दरम्यान, यशस्वी जैस्वालसोबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि निवडसमितीतील शिवसुंदर दास यांनी सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे ही चर्चा रोहित शर्मा मैदानावरून गेल्यानंतर सुरू झाली. यशस्वीला उशिरापर्यंत सरावाची संधी देण्यात आली आणि त्याच्या फलंदाजीतील बारकावे विशेष लक्षपूर्वक पाहिले गेले. त्यामुळेच अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे की, यशस्वी जैस्वालला संधी देऊन रोहितच्या जागी संघात परिवर्तन करण्याचा विचार सुरू आहे.
 
 

कर्णधारपदावरूनही पायउतार
रोहित शर्माचा rohit sharma  मूड प्रॅक्टिस दरम्यान अत्यंत खिन्न दिसून आला. तो याआधी कधीच इतका शांत आणि अंतर राखणारा वाटला नव्हता. रोहितला अजूनही कर्णधारपदाची जबाबदारी निभावायची आहे, मात्र निवड समितीने वेगळाच निर्णय घेतला असून, पुढील सामन्यांसाठी शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवले गेल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.गुरुवारी सकाळी 9 वाजता होणारा एडिलेड वनडे सामना केवळ मालिका दृष्टीनेच नव्हे, तर रोहित शर्माच्या भविष्यासाठीही निर्णायक ठरू शकतो. 2027 विश्वचषकासाठी संघाच्या नव्या रचनेवर काम सुरू असून, सीनियर खेळाडूंना स्थान टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी आवश्यक आहे. रोहित आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांनाही अपवाद नाही.संपूर्ण पार्श्वभूमी पाहता, रोहित शर्माचं करिअर एका निर्णायक वळणावर उभं आहे. गेल्या काही वर्षांतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय भारतीय कर्णधारांपैकी एक असलेला रोहित जर खरंच संघातून बाहेर जाणार असेल, तर ती केवळ एक क्रिकेटिंग बातमी न राहता, भावनिक आणि ऐतिहासिक वळण असेल.एडिलेडमधील सामना, त्यातील रोहितची फलंदाजी आणि त्यानंतर बीसीसीआय व निवड समितीचा पुढचा निर्णय — या सर्वांकडे आता देशातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.
Powered By Sangraha 9.0