समुद्रपूर,
samir kunawar तालुयातील वाघेडा-लसनपूर रस्त्यावरील पूल अतिवृष्टीने खचून दैनावस्था झाली आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी वाघेडा ग्रापंच्या वतीने आ. समीर कुणावार यांच्याकडे ठरावातून करण्यात आली. या मागणीची तात्काळ दखल घेत आ. कुणावार यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्याला पुलाची पाहणी करून दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.
वाघेडा गावाला samir kunawar मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी लसनपूर-वाघेडा हा एकमेव मार्ग आहे. यंदा अतिवृष्टीमुळे या मार्गावरील पुलाची परिस्थिती अत्यंत खराब झाल्याने या मार्गावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याचा ठराव वाघेडा ग्रापंच्या वतीने घेण्यात आला. यासंबंधी आ. समीर कुणावार यांना निवेदन दिले. आ. कुणावार यांनी मागणीची त्वरित दखल घेऊन बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधून तातडीने पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. निवेदन देतेवेळी वाघेडाचे सरपंच अमोल मसराम, उपसरपंच रवींद्र ठोंबरे, ग्यानी शिरोडे, शेषराव तुळणकर, रवींद्र लडी, होमराज आराडे आदी उपस्थित होते.