कापूस, सोयाबीन... सगळी खरेदी सरकार करणार

23 Oct 2025 20:20:31
नागपूर,
Devendra Fadnavis कापूस, सोयाबीन.. सगळी खरेदी सरकार करणार असल्याचा विश्वास देत नोंदणी व खरेदी केंद्र लवकरच सुरू करत आहोत, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्त शेतकèयांना आश्वासित केले.
 

Devendra Fadnavis 
ते म्हणाले की, सोयाबीन, कापूस खरेदीबाबत सरकार गंभीर आहे. आपली व्यवस्था अशी आहे की आधी नोंदणी व नंतर खरेदी होते. पूर्वी हे नव्हते. त्यामुळे काही लोक या व्यवस्थेला हायजॅक करायचे आणि सर्क्युलेशनमध्ये कापूस किंवा सोयाबीन विकायचे. म्हणूूून ही व्यवस्था आपण सुरू केली आहे. लवकरचनोंदणी सुरू करत आहोत. शेतकèयांना आवाहन आहे की, त्यांनी व्यापाèयांना विक्री करू नये, लवकरच नोंदणी सुरू करीत आहोत. ती सुरू झाल्यानंतर खरेदी केंद्रही सुरू करीत आहोत. त्यामुळे व्यापारी हमी भाव देत नसेल तर त्या विकू नका. सरकार सर्व खरेदी करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
 
माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित दीपावली स्नेहमिलनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक संवाद साधला. महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, भाजपाचे महानगर अध्यक्ष दयाशंंकर तिवारी, माजी आ. सुधाकर कोहळे, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व्यासपीठावर उपसि्ेथत होते.
प्रारंभी मुख्यमंत्री Devendra Fadnavis  म्हणाले की, आपल्या सरकारला डिसेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण होईल. आपल्या महाराष्ट्र, विदर्भ, नागपूरकरता जे-जे शक्य आहे, ते करण्याचा प्रयत्न आहे. गतिशिलतेने परिवर्तन कसं करता येईल , असा प्रयत्न आम्ही करतो आहोत. निश्चितपणे या प्रयत्नात आपल्या सर्वांचा पाठिंबा आणि सहभाग या दोन्ही गोष्टी मिळतात व त्या महत्त्वाच्याही आहेत. या जोरावरच अनेक गोष्टी करू शकतो.
 
 
वीजदर कमीच
विजेचे 2025 ते 2030 या पाच वर्षांचे दर एमईआरसीकडून मंंजूर करून घेतले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत आता आपला वीज दर जास्त नाहीय. आपल्याकडे फ्लोर रेट दाखवतात. त्या फ्लोर रेटसोबत आपण वेगवेेगळे 4 सबसिडी देतो. एफिशियंट वीज वापरतात त्यांना छत्तीसगडपेक्षाही कमी दराने वीज पडते. आपले फ्लोर रेटही त्यांच्या सोबत आलेले आहेत. दरवर्षी आपले वीज दर कमी होणार आहेत. 2030 मध्येे आपले रेट हे छत्तीसगडपेक्षाही फ्लोर रेटही कमी असतील.
 
 
कुंभ मेळा
जुलै 2027च्या कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी कठीण जाते. प्रयागराजमध्ये 15 हजार हेक्टर जमीन उपलब्ध असते. नाशिक व त्र्यंबक मिळून फक्त 500 एकर जमीन आहे. तरीही आम्ही त्याचे नियोजन उत्तम केले आहे. क्राऊड मॅनेजमेंट, सर्वांना स्नानाची संधी मिळण्यासाठी व्यवस्था केली जाईल. अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Powered By Sangraha 9.0