हॉलीवूड,
actress isabel tate death मनोरंजन क्षेत्रातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. ‘9-1-1: नॅशव्हिल’ या लोकप्रिय मालिकेतून प्रकाशझोतात आलेली तरुण अभिनेत्री इसाबेल टेट हिचे वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी निधन झाले आहे. दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराशी लांब काळ झुंज देत असताना तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण हॉलीवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
इसाबेलच्या निधनाची actress isabel tate death अधिकृत माहिती तिच्या टॅलेंट एजन्सी ‘मॅकक्रॅ एजन्सी’ने समाजमाध्यमांवर दिली. एजन्सीने अभिनेत्रीचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली – “इसाबेलने ज्या पहिल्या मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं, त्याच मालिकेत तिला भूमिका मिळाली. कमी वयात, कमी काळात तिने मोठं नाव कमावलं. तिचा उज्ज्वल भविष्यासाठीचा प्रवास दुर्दैवाने अल्पावधीतच संपला.” एजन्सीने इसाबेलच्या आई, बहीण, कुटुंबीय आणि तिच्या जवळच्या मित्रमंडळींप्रती शोक व्यक्त केला आहे.
इसाबेल टेटला actress isabel tate death ‘शार्कोट मॅरी टूथ’ (Charcot-Marie-Tooth – CMT) नावाच्या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल विकाराने ग्रासले होते. या आजारामुळे शरीरातील नसांची कार्यक्षमता कमी होत जाते आणि स्नायूंवर परिणाम होतो. इसाबेलला हा आजार केवळ १३ वर्षांची असतानाच झाला होता. तिने लहानपणापासून या आजाराशी झुंज दिली, मात्र अखेर तिचं शरीर या लढाईत हरलं.२०२२ साली इसाबेलने आपल्या सोशल मीडियावर या आजाराबाबत सविस्तर माहिती दिली होती. तिने स्वतःच्या आरोग्याविषयी बोलताना चाहत्यांना सकारात्मक राहण्याचा संदेश दिला होता. तिच्या पोस्टला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि अनेकांनी तिच्या धैर्याचं कौतुक केलं होतं.
‘9-1-1: नॅशव्हिल’मधील भूमिकेमुळे इसाबेलने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. तिच्या अभिनयातील नैसर्गिकता आणि भावनांची अभिव्यक्ती प्रेक्षकांना भुरळ घालत होती. तिच्या निधनानंतर मालिकेतील सहकलाकार, निर्माते आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केलं आहे.तरुण वयात या प्रतिभावान अभिनेत्रीचं जाणं ही इंडस्ट्रीसाठीच नव्हे, तर तिच्या चाहत्यांसाठीही मोठी पोकळी आहे. इसाबेल टेटने दिलेली प्रेरणा आणि तिचं लढाऊ जीवनप्रेरणादायी ठरले आहे.