‘थामा’ बॉक्स ऑफिसवर ठरली ब्लॉकबस्टर

५ दिवसांत ओलांडला १०० कोटींचा टप्पा

    दिनांक :26-Oct-2025
Total Views |
मुंबई :
thama box office बॉलिवूडमधील बहुगुणी अभिनेता आयुष्मान खुराना आपल्या वेगळ्या भूमिकांमुळे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. मात्र, त्याच्या करिअरमधील एक गोष्ट कायम चर्चेत राहिली – ती म्हणजे २०० कोटींचा आकडा पार करणारा चित्रपट त्याला अद्याप मिळाला नव्हता. पण आता त्याचा नवा सिनेमा ‘थामा’ ही कमतरता लवकरच भरून काढणार असल्याचे संकेत बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या आकड्यांमधून मिळत आहेत.
 
 
thama box office
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘थामा’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर केवळ पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर शतक झळकावले आहे. चित्रपटाने देशांतर्गत बाजारात पहिल्या चार दिवसांत तब्बल ६५.६० कोटी रुपयांची कमाई केली होती, तर एकूण ग्रॉस कलेक्शन ७८.७० कोटींवर पोहोचले. विदेशात या चित्रपटाने ११.३० कोटींची कमाई केली असून, जगभरातील एकत्रित आकडा चार दिवसांत ९० कोटींवर गेला होता.
 
 
पाचव्या दिवशी ‘थामा’ ने आणखी १३ कोटी रुपयांची कमाई करत एकूण १०३ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. या घडीला चित्रपटाची परदेशातील पाचव्या दिवसाची कमाई समोर यायची आहे, मात्र देशांतर्गत आकड्यांवरूनच तो एक मोठा ब्लॉकबस्टर ठरत आहे, असे स्पष्ट झाले आहे.
 
 
ही आयुष्मान thama box office  खुरानाच्या कारकिर्दीतील पाचवी शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेली फिल्म ठरली आहे. शिवाय, ‘थामा’ ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग डे कलेक्शन करणारी फिल्म ठरली आहे. चित्रपटाने शनिवारी १३ कोटी रुपयांची दमदार कमाई करत प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही आश्चर्यचकित केले.विशेष म्हणजे, ‘थामा’ ने एकाच दिवशीच्या कमाईच्या बाबतीत ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा १’ ला मागे टाकले आहे. ‘कांतारा’ ने शनिवारी ९ कोटींची कमाई केली होती, तर ‘थामा’ ने त्याच दिवशी १३ कोटींचा गल्ला जमवला. याचबरोबर, इतर काही प्रदर्शित चित्रपट जसे की ‘ड्यूड’ फक्त ३ कोटींवर थांबले, ज्यामुळे आयुष्मानचा चित्रपट अधिकच ठसठशीतपणे पुढे गेला आहे.प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि सकारात्मक वर्ड-ऑफ-माउथमुळे ‘थामा’च्या कमाईचा आलेख अजूनही चढता आहे. चित्रपट पुढील काही दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार करेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या यशामुळे आयुष्मान खुरानाने आपल्या करिअरमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला असून, ‘थामा’ त्याच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक म्हणून नोंदवली जाण्याची चिन्हे आहेत.