वर्धा नपच्या १० प्रभागांमधील ५३ हरकतींवर सुनावणी

27 Oct 2025 19:34:31
वर्धा, 
Hearing on 53 objections in Wardha वर्धा नगरपरिषदेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. २० प्रभागांमधील मतदार याद्यांवर एकूण २६६ हरकती घेण्यात आल्या. १ ते १० या प्रभागांमधील मतदार याद्यांवर दाखल केलेल्या ५३ हरकतींवर आज २७ रोजी सुनावणी घेण्यात आली. उर्वरित ११ ते २० या प्रभागांमधील मतदार याद्यांवर दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, मुख्याधिकारी विजय देशमुख आणि उपमुख्याधिकारी अभिजित मोटघरे यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या आदरणीय अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ही सुनावणी घेण्यात आली.
 

Hearing on 53 objections in Wardha 
 
वर्धा नगर परिषदेच्या २० प्रभागांमधील ४० वाडार्र्च्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख १७ ऑटोबरपर्यंत वाढविण्यात आली. वर्धा नगर परिषदेच्या २० विभागांमधील ४० वार्डातील मतदार यादीवर २६६ हरकती दाखल करण्यात आल्या. १० प्रभागांमधील २० वार्डातील ५३ हरकतींवर आज सुनावणी घेण्यात आली. बहुतेक हरकती स्वीकारण्यात आल्या तर काहींनाच स्थगिती देण्यात आली. प्रभाग ११ ते २० मधील उर्वरित २० वार्डांसाठी मतदार यादीवर उद्या २८ रोजी सुनावणी होणार आहे.
 
 
 
न्यायालयात जाण्याचा विचार
नगर परिषदेच्या निवडणुकीत लढणारे उमेदवार मतदार यादीची छाननी करत आहेत. तथापि, मोठ्या प्रमाणात विसंगती समोर आल्याने आक्षेप नोंदवल्या गेले. बहुतेक हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत, तर काही नामंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे निराश होऊन आक्षेप दाखल करणारे न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे कळते.
 
 
सहा नपच्या मतदार याद्यांवर २ हजार आक्षेप
१७ ऑटोबरपर्यंत जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या मतदार याद्यांवर २००२ आक्षेप दाखल करण्यात आले होते. वर्धा नगरपरिषदेत २६६, हिंगणघाटात ८३, आर्वीत ३२८, पुलगावात ५७६, देवळीत ८७ आणि सिंदी रेल्वे नगरपरिषदेत ६६२ आक्षेप दाखल करण्यात आले होते. सर्व नगरपरिषदांमध्ये दाखल केलेल्या आक्षेपांवर सुनावणी होणार आहे. दुरुस्त्यांनंतर ३१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. ७ नोव्हेंबर रोजी मतदार केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
Powered By Sangraha 9.0