हिराचंद नेमचंद जैन वसतिगृहाचे संरक्षण व्हावे

27 Oct 2025 19:41:45
बुलडाणा,
Hirachand Nemchand Jain Hostel पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली आहे. या निर्णयाला जैन समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभुमीवर आज २७ ऑटोबर रोजी अखिल भारतीय दिंगबर जैन सैतावाळ संस्था व शहरातील दिंगबर जैन बांधवांनीजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत, जैन वसतिगृहाचे संरक्षण व्हावे अशी मागणी केली.
 
 

Hirachand Nemchand Jain Hostel 
 
यावेळी दिलेल्या निवेदनात, गोखले बिल्डर सोबत झालेला सदर जैन वस्तीग्रहाचा व्यवहार रद्द करण्यात यावा, व्यवहार रद्द करण्याचे अधिकार धर्मजा आयुक्तांना नाही तर दिवाणी न्यायालयाला आहेत. त्यामुळे दिवाणी न्यायालयामार्फत सदर व्यवहार रद्द व्हावा, संस्थेच्या विश्वस्त मंडळाची पूररचना व्हावी, विश्वस्त मंडळ मध्ये फक्त जैन समाजाचे विश्वस्त असावेत, ज्यांनी हा व्यवहार घडून आणल्या त्या सर्वांवर कारवाई व्हावी. सदर हिराचंद नेमीचंद जैन वस्तीगृहाचे संरक्षण व्हावे, जैन समाजाला वारंवार लक्ष्य केले जात आहे यासंबंधी राज्याच्या मुख्यमंत्री व प्रशासनाने योग्य दखल घ्यावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. निवेदन देतांना अखिल भारतीय दिंगबर जैन सैतावाळ संस्था जिल्हाध्यक्ष अरविंद सैतवाल, वर्धमान चव्हाण, नेमिनाथ सातपुते, भिकुलालजी शिंगतकर, अशोक बोराळकर, संजय माडीवाले, मोहन संतापे, विलास चव्हाण, प्रशांत काळे, राजेश चतुर यांच्यासह शहरातील सकल जैन समाज बांधव उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0