रेल प्रकल्पाच्या फेज-२ अंतर्गत उर्वरित कामांना वेग

डबल डेकरसाठी सेगमेंट लॉन्चिंगचे काम नोव्हेंबरमध्ये

    दिनांक :27-Oct-2025
Total Views |
रीच-४अ येथे सेगमेंट लॉन्चिंगची सुरुवात
नागपूर,
Segment launching for double decker मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज-२ अंतर्गत प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगरच्या ५.३१ किमीच्या कामांची सुरुवात झाल्यानंतर उर्वरित कामांना वेग आला आहे. यामुळे भंडारा रोडवरील औद्योगिक परिसर, ट्रान्सपोर्ट नगर, कळमना मार्केट, विद्यापीठ तसेच हिंगणा, बुटीबोरी, कान्हन आणि नागपूर शहरातील इतर भाग यांमधील कनेटिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे. पारडी फ्लायओव्हर सुरु झाल्यानंतर आता महा-मेट्रोच्या दोन फ्लायओव्हर डेक्समधील ३ मीटर अंतरातून मेट्रो पियर आणि मेट्रो पियर कॅप बांधण्याचे केल्या जात आहे. महा-मेट्रोने ७१ पियर आणि पियर कॅप्सपैकी ३३ पियर्स आणि १० पियर पूर्ण केल्या आहेत. डबल डेकरसाठी सेगमेंट लॉन्चिंगचे काम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा मेट्रो रेलच्या वतीने व्यक्त केली आहे.
 
 
Segment launching for double decker
सेगमेंट लॉन्चिंगचे काम सुरू
महा-मेट्रोने रीच-४अ मध्ये सेगमेंट लॉन्चिंगचे काम सुरू केले असून प्रक्रियेत प्रीकास्ट काँक्रीट सेगमेंट्स उचलून आणि अचूकपणे बसवून व्हायडक्टची रचना केल्या जात आहे. ३१ मीटर लांबीचा स्पॅन शिवालिक लॉन्चिंग गर्डर वापरून यशस्वीपणे बसविण्यात आला आहे. हा टप्पा प्रकल्पाच्या प्रगतीतील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.
 
 
सुरक्षा नियमांचे पालन
लॉन्चिंग गर्डरमधील विंच असेंब्लीद्वारे सेगमेंट्स एकामागून एक उचलले जातात. ही प्रक्रिया सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून केली जाते ‡ ज्यामध्ये लिफ्टिंग प्लॅन, रिस्क अ‍ॅहसेसमेंट, लिफ्ट परमिट तसेच उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचारी यांचा वापर केला जातो. सुरक्षा ही संपूर्ण प्रक्रियेत सर्वोच्च प्राधान्याने पाळली जाते. एलजीचे कार्यक्षेत्र ४ पी ४० ते ४ पी ९९ पर्यंत असून एकूण ५९ स्पॅन (१.७४ किमी लांबीचा उंच व्हायडक्ट) यात समाविष्ट आहेत. एका स्पॅनचे सेगमेंट लॉन्चिंग ‡ ज्यात सर्व सेगमेंट्सचे लिफ्टिंग, ड्राय मॅचिंग, ग्लूसइंग, पोस्ट-टेंशनिंग आणि स्पॅन लोअरिंग यांचा समावेश असतो. ही प्रक्रिया साधारणपणे ५ ते ७ दिवसांत पूर्ण केली जाते. मध्ये सुरू करण्यात आलेला शिवालिक एलजी हा पहिला लॉन्चिंग गर्डर आहे. उर्वरित दोनशिखर आणि गिरी हे अनुक्रमे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कार्यान्वित होणार आहेत.
 
 
पारडी डबल डेकर फ्लायओव्हर
रीच-४अ मध्ये व्हायडक्टचा किमी लांबीचा भाग हा डबल डेकर रचनेचा असून, याला सर्वसाधारणपणे पारडी डेकर म्हणून ओळखले जाते. या डबल डेकरमध्ये खालच्या स्तरावर एनएचएआय फ्लायओव्हर तर वरच्या स्तरावर मेट्रो व्हायडक्ट आहे. एनएचएआय आणि महा-मेट्रो यांच्यातील सामंजस्य करारानुसार, एनएचएआय ने कॉमन फाउंडेशन्स आणि कॉमन पियर्स फ्लायओव्हर लेव्हलपर्यंत बांधून एच बी टाऊन व भंडारा फ्लायओव्हर डेक्स बसविले आहेत.