प्रवाशांच्या सोयीसाठी छठपूजेनिमित्त विशेष गाड्या

27 Oct 2025 21:46:00
नागपूर,
Special trains for Chhath Puja दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी व छठपूजेनिमित्त विशेष गाड्या चालविण्यात आल्या. या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून विक्रमी उत्पन्नाची नोंद करण्यात आली आहे. दपूम रेल्वे नागपूर विभागातर्फे २३ ऑक्टोबरला चालविण्यात आलेल्या गोंदिया-पटणा छठपूजा विशेष गाडीमध्ये १ हजार २७३ प्रवाशांनी प्रवास केला. या माध्यमातून ९ लाख ७१ हजार ४४९ रुपये उत्पन्न मिळाले. २४ ऑक्टोबरला १ हजार ७९ प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले आणि लाख १३ हजार २९४ उत्पन्न रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाले.
 
 

Special trains for Chhath Puja 
 
२३ ऑक्टोबरला नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-जयनगर छठपूजा विशेष गाडी चालविण्यात आली. या गाडीत १ हजार ४२६ प्रवाशांनी प्रवास केला आणि १० लाख ६४ हजार ८३३ रुपये उत्पन्न रेल्वेला मिळाले. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर विभागाने अनेक सुविधा उपलब्ध करून दपूम नागपूर विभागाने सणांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी वेळेत विशेष गाड्यांचे संचालन केले आहे. प्रवाशांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आमच्या कर्मचार्‍यांचे परिश्रम आणि समर्पणाचे फलित आहे.
Powered By Sangraha 9.0