आत्महत्येच्या प्रयत्नाचा थरारक व्हिडिओ व्हायरल..

    दिनांक :27-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Suicide attempt video सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी आणि धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या तत्परतेने एका महिलेचा जीव वाचवतानाचे दृश्य पाहायला मिळत आहे. जर पोलिसाने काही क्षणांचा विलंब केला असता, तर त्या महिला आपले प्राण गमावली असती, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
 
 
 
Suicide attempt video
घटनेत दिसते की, एका खोलीत एक महिला आत्महत्येचा प्रयत्न करत होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच एक कॉन्स्टेबल घटनास्थळी पोहोचला. खोलीचे दार आतून बंद होते. कॉन्स्टेबलने प्रथम दार ठोठावले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याने क्षणाचाही विलंब न करता दाराला लाथ मारून आत प्रवेश केला. आत शिरताच समोर उभे असलेले दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले महिला पंख्याला दोरी बांधून गळफास घेण्याच्या तयारीत होती.
 
सौजन्य - सोशल मीडिया
 
कॉन्स्टेबलने आणि आसपासच्या लोकांनी तत्काळ कृती करत महिलेला खाली उतरविले आणि दोरी कापून तिचा जीव वाचवला. दिलासादायक बाब म्हणजे त्या महिलेला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही आणि ती सुरक्षित आहे. पोलिसांनी लगेच प्राथमिक उपचार करून तिला शांत केले. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेचा तिच्या पतीशी वाद झाला होता, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. मात्र, पोलिसांच्या जागरूकतेने आणि तातडीच्या कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला.