मूल-चंद्रपूर मार्गावर वाघिणीची दहशत कायम

दुचाकीवरील दाम्पत्य थोडक्यात बचावले

    दिनांक :27-Oct-2025
Total Views |
चंद्रपूर,
Tiger on Mul-Chandrapur road मूल-चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट परिसरात गेल्या आठवड्याभरापासून ‘के मार्क’ नावाच्या वाघिणीने नागरिकांना अक्षरश: जेरीस आणले आहे. दोन दिवसांपूर्वी या वाघिणीने एका दुचाकीस्वाराला जखमी केले होते. तर दुसर्‍या एका घटनेत दुचाकीवरुन जाणारे एक दाम्पत्य थोडक्यात बचावले. हे दाम्पत्य दुचाकीवरुन जात असतानाच मागून वाघीण आली आणि रस्ता ओलांडत दुसरीकडे गेली. क्षणभरासाठी का होईना, त्यांचा जीव कंठाशी आला होता.
 
 
Tiger on Mul-Chandrapur road
 
 
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘के मार्क’ वाघिणीने तिच्या बछड्याला अपघातात गमावल्याचा संशय असून, त्यामुळे ती वाघीण चवताळी आहे, असे सांगितले जात आहे. केसलाघाट परिसरात ‘के मार्क’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघिणीला दोन बछडे होते. त्यापैकी एका बछडा अपघातात मृत्यमुखी पडल्याचा अंदाज आहे. या रस्त्याच्या उजव्या बाजूला प्रादेशिकचे वनक्षेत्र तर डाव्या बाजूला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे बफर क्षेत्र आहे. दक्षिण ताडोबाचा केसलाघाट आणि झरीपेठचे जंगल तिचा अधिवास आहे. अतिशय जोखमीच्या तिच्या अधिवासातून राष्ट्रीय महामार्ग जातो. अनेकदा या मार्गावर ती कायमच बछड्यांसोबत फिरताना दिसून येते. त्यामुळे पर्यटकच नाही तर या मार्गावरुन जाणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना ती दिसते.