नैसर्गिक आपत्तीतून हवालदिल कुटुंबाला ४ लाखांची मदत

28 Oct 2025 19:02:07

Borgaon Meghe News
 
वर्धा,
Borgaon Meghe News घराच्या आवारात खेळत असलेला बोरगाव मेघे येथील ३ वर्षीय चिमुकल्याचा नाल्याच्या पुरात वाहून जात मृत्यू झाला. संबंधित घटनेनंतर नैसर्गिक आपत्ती विभागाने त्या बालकाच्या कुटुंबाला ४ लाखांची शासकीय मदत देण्यात आली. जिल्ह्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यावर पुरपरिस्थितीचे संकट ओढावले होते. १२ सप्टेंबर रोजी बोरगाव (मेघे) येथील प्रियांशू पंकज मोहदुरे (३) हा घराच्या आवारात खेळत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेला. ही बाब लक्षात आल्यावर प्रियांशूला तातडीने पाण्याबाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉटरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवाल तसेच वर्धा तहसीलदारांकडून अहवाल आल्यानंतर मोहदुरे कुटुंबाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ४ लाखांची शासकीय मदत देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0