गेवर्धा येथे अधिकारी प्रशिक्षणार्थी यांचा क्षेत्रीय अभ्यास दौरा

28 Oct 2025 18:47:56
कुरखेडा, 
Gewardha-Field Study Tour : अतिरिक्त संचालक आणि अभ्यासक्रम संचालक नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इंडायरेक्ट टॅक्सस आणि नार्कोटिक्स पालासमुद्रम, आंध्रप्रदेश यांनी विशेष फाउंडेशन फोर्स 2025 अधिकारी प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी फील्ड स्टडी आणि रिसर्च प्रोग्रामकरीता ग्रामपंचायत स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरून ग्रामपंचायत गेवर्धा यांची निवड करण्यात आली होती. क्षेत्रीय अभ्यास दौर्‍याकरीता 10 अधिकारी प्रशिक्षणार्थी समावेश असलेल्या चमुंचे ग्रामपंचायत कार्यालयात आगमन होताच भारतीय संस्कृतीप्रमाणे औक्षवण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचे शाल, शिफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
klj
 
 
 
ग्रामपंचायत अंतर्गत सर्व विभागाचा आढावा घेण्यासाठी सरपंच सुषमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अधिकारी प्रशिक्षणार्थी टिमप्रमुख मेलवीन जेम्स, जी साई दर्शनी, सुरभी जैन जयंत गर्ग, विश्‍वजीत सिंग होळकर, हिमांशू, शास्वत अग्रवाल, आदेश शर्मा, सौरभ कुमार जाट, दिपेंदर प्रित सिंग, तहसीलदार धनभाते, प्रभारी गटविकास अधिकारी राजेश फाये, सहाय्यक गटविकारी अधिकारी भोगे, विस्तार अधिकारी कुळसंगे, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत अंतर्गत सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
 
याप्रसंगी ग्रामपंचायत आणि सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर गाव भेटीदरम्यान महिला ग्रामसंघ कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना लाभार्थ्यांशी संवाद साधला. सदर चमुकडून ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे आणि उल्लेखनिय कार्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य रोशन सय्यद यांनी तर तर आभार ग्रामपंचायत अधिकारी देवानंद भोयर यांनी मानले. ग्रामपंचायत कर्मचारी यांनी यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0