साई सावली आश्रमाला दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट

28 Oct 2025 15:34:59
नागपूर,
Sai Savli Ashram दिवाळीच्या शुभपर्वानिमित्त समाजसेविका सपना रोडी यांनी अमर आशा लेआऊट येथील साई सावली आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि दिवाळीचा आनंद त्यांच्यासोबत वाटला.
 
Sai Savli Ashram
 
साई सावली आश्रमाच्या संचालिका विशाखा मोहोड, मोहोड, अभिजित कढाळे तसेच त्यांची संपूर्ण टीम समाजसेवेचे प्रशंसनीय कार्य करत आहेत. सध्या या आश्रमात सुमारे २५ वयोवृद्ध स्त्री-पुरुष वास्तव्यास असून, त्यांच्या आरोग्याची आणि दैनंदिन गरजांची विशेष काळजी घेतली जाते. Sai Savli Ashram “समाजालाही आपले काही देणे लागते” या भावनेतून प्रेरित होऊन सपना रोडी, वेदश्री रोडी आणि उषा पटले यांनी आश्रमाला भेट देऊन वयोवृद्धांसोबत काही क्षण घालवले. या उपक्रमामुळे आश्रमातील वातावरण आनंद आणि उत्साहाने उजळून निघाले.

सौजन्य: सपना रोडी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0