वर्धा.
Missed the flight because of Bachchu Kadu शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातून बेलोरा येथून काल सोमवारी महाएल्गार ट्रॅक्टर रॅली काढली. आज मंगळवारी वर्दी वरून नागपूरकडे जाताना तुळजापूर बुट्टीबरी मार्गावर ट्रॅक्टर मुळे वाहतुकीची कोंडी झाली. परिणामी वर्धेवरून नागपूर येथील विमानतळावरून पुन्हा मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची विमान हुकल्याची माहिती आहे तर नागपूर वरून वर्धा मार्गे पुण्याला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स ही दोन तास उशिरा येत असल्याची माहिती मिळाली. माजी आमदार बच्चू कडू यांनी बेलोरा येथून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच दिव्यांगांचे प्रश्न घेऊन महाएल्गार ट्रॅक्टर रॅली काढली. ही ट्रॅक्टर रॅली काल रात्री उशिरा वर्धा जिल्ह्यात दाखल झाली.
वर्धा शाळा नजीक असलेल्या सुकळी बाई येथे बच्चू कडू यांच्या ताफ्याने मुक्काम केला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही ट्रॅक्टर रॅली वर्धा, पवनार सेलू मार्गे नागपूरकडे रवाना होत असताना बुटीबोरी तुळजापूर महामार्गावर रॅलीतील हजारो ट्रॅक्टर व अन्य वाहनांनी वाहतुकीची कोडी झाली. वर्धा येथील अनेक प्रवासी नागपूर येथील विमानतळावरून पुणा, मुंबईला जाण्यासाठी दुपारी निघाले. मात्र रस्त्यात वाहतूक कोंडी असल्याने विमान प्रवासी नागपूर विमानतळावर पोहोचू शकले नाही. त्यामुळे त्यांना अभिमान मिळू शकली नाही परिणामी तिकीट चे पैसे वाया गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नागपूर वरून वर्धा मार्गे पुणे येथे अनेक खाजगी ट्रॅव्हल्स जातात. हा ट्रॅक्टर मोर्चा रस्त्यात असल्याने नागपूर येथून दुपारी चार वाजता पासून निघालेल्या ट्रॅव्हल्स सायंकाळपर्यंत वरती पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास ताटकळत बसावे लागले.