दारूबंदी व वाहतूक नियमभंगावर नागपूर पोलिसांची संयुक्त मोहीम

28 Oct 2025 15:37:03
नागपूर,
campaign against liquor नागपूर शहर पोलिसांनी दारूबंदी व वाहतूक नियमभंगाविरोधात मोठी कारवाई केली. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घेतलेल्या या मोहिमेत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ४ प्रकरणांत ४ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, रुपये ८ हजार २६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, शहर वाहतूक शाखेने ‘इंकन ड्राईव्ह’ आणि विविध कलमांखाली ८३७ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून पोलिसांनी १ लाख ११ हजार ५०० रुपये इतके तडजोड शुल्क वसूल केले. वाहन चालविताना हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे, परवाना नसणे, कागदपत्रांची अनुपलब्धता आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणे अशा विविध नियमभंगांवर ही कारवाई करण्यात आली.
 
 

नागपूर पोलीस  
 
 
दारूबंदी आणि जुगारविरोधी कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येतील. शहरातील हॉटेल्स, बार आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जाईल. वाहतूक शाखेनेही स्पष्ट केले की, ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’, ‘सेफ ड्रायव्हिंग – नो फायनिंग’ या मोहिमांतर्गत नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास अपघात आणि दंड दोन्ही टाळता येतील. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.campaign against liquor दरम्यान, नागपूर शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहन चालविताना सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. नागपूर पोलिसांकडून असेही सूचित करण्यात आले की, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा विशेष मोहिमा नियमितपणे सुरू राहणार आहेत.वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसातर्फे राबविण्यात आल्या असून, गापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0