नागपूर,
taekwondo competition प्रथ्वीराज तायक्वांदो एक्सलन्स सेंटरची खेळाडू आणि स्कूल ऑफ स्कॉलर्स, आत्रे ले-आऊट, नागपूर येथील विद्यार्थिनी सायशा जयस्वाल हिने क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत (१९ वर्षांखालील, ४६ किलोपेक्षा कमी वजन गटात) सुवर्णपदक पटकावले.
ही स्पर्धा १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. नागपूरचे प्रतिनिधित्व करताना सायशाने उत्कृष्ट कौशल्य आणि दमदार खेळाच्या जोरावर कोल्हापूर, पुणे आणि अंतिम फेरीत छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिस्पर्धकांना पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. taekwondo competition या उल्लेखनीय कामगिरीमुळे सायशा जयस्वालची निवड आता जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी (National School Games Championship) झाली आहे. सायशाच्या या यशाबद्दल तिचे प्रशिक्षक, पालक आणि शाळेच्या शिक्षकांनी तिला अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.
सौजन्य: अमोल पुसदकर, संपर्क मित्र