नागपूर,
Scientific Auditorium Laxmi Nagar सेव्हन नोट्स’ आयोजित ‘सुरमयी यादों की शाम’ हा संगीत कार्यक्रम शुक्रवार, ३१ ऑक्टोबरला सायं. ६ वाजता, सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क असून सर्व रसिकांना प्रवेश खुला आहे.
कार्यक्रमाची संकल्पना मुकुल पांडे व प्रा. पद्मजा सिन्हा यांची असून निवेदन वैभव पारसकर करतील.संगीत सादरीकरणात मुकुल पांडे, पद्मजा सिन्हा, डॉ. सुधीर कुन्नावार, सुचिता पद्मावार,Scientific Auditorium Laxmi Nagar अमित पेढेकर, अर्चना उचके, आरती भालेराव, जयवंत इंगळे, शशिकांत वाघमारे, लता व दीपक राईरकर, स्वप्निल नांदे, प्रकाश कुलकर्णी, रजनी ठाकरे, सुषमा खांडेकर व संगीता भगत सहभागी होतील.आर्य पुराणकर व सचिन ढोमणे यांचे संगीत संयोजन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे.
सौजन्य:वर्षां किडे /कुळकर्णी ,संपर्क मित्र