हृदयातून पेटवलेले दिवेच समाज उजळवतात

28 Oct 2025 16:22:13
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
nanddeep foundation देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ यांच्या सामाजिक बांधिलकीतून दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. नंददीप फाउंडेशन, यवतमाळ येथील बेघर मनोरुग्णांना दिवाळीचा फराळ व कपडे देऊन आनंद आणि स्नेहाचा प्रकाश त्यांच्या जीवनात पसरविण्यात आला.
 
 

नंदादीप  
 
या उपक्रमात निवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, महावितरण विभागाच्या अभियंता संगीता चव्हाण, तसेच देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव चंदा पवार यांच्या हस्ते प्रभूजींना फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी फाउंडेशनमधील रुग्णांशी सुसंवाद साधत, आत्मीयतेने सणाचा आनंद साजरा केला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वैद्य पंकज पवार यांनी सांगितले की, दिवाळी म्हणजे फक्त दिवे आणि फटाके नव्हेत, तर माणुसकीचा प्रकाश सर्वत्र पसरवणे हीच खरी दिवाळी आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रेम, स्नेह आणि सहानुभूतीचे प्रकाशदीप पोहोचविणे, हाच संस्थेचा खरा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या सचिव चंदा पवार यांनी सांगितले की, देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्था मागील 25 वर्षांपासून विविध सेवा प्रकल्प राबवत असून, आरोग्य, शिक्षण, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास, तसेच सामाजिक संवेदना जोपासणारे उपक्रम सातत्याने पार पाडले जातात.nanddeep foundation नंदादीप फाउंडेशन येथील दिवाळी उपक्रम हा संस्थेच्या सेवायात्रेतील एक संवेदनशील उपक्रम ठरला.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने केले. उपस्थितांनी संस्थेच्या या सामाजिक संवेदनशील उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांमुळे समाजात प्रेम, सहानुभूती व मानवी मूल्यांचा दिवा सतत प्रज्वलित राहावा अशी भावना व्यक्त केली. सेवा, संवेदना आणि स्नेह यांनाच खरी दिवाळी मानणाèया देवी सामका संस्थेचा हा उपक्रम अनेकांच्या जीवनात प्रकाशाचा किरण ठरला आहे.
Powered By Sangraha 9.0