जागृतीचे आवाहन : आपल्या पिढीसाठी एक जबाबदारी..!

28 Oct 2025 18:43:21
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
smart-parenting-workshop : सतत बदलत जाणाèया आधुनिक युगात मोबाईल, इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या आहारी गेलेली आजची तरुण पिढी संस्कार, मूल्ये आणि जबाबदारीपासून दूर जात आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात, अभ्यासावरील अनास्था आणि मानसिक ताणतणावामुळे अनेक कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 

mob 
 
 
 
या बदलत्या परिस्थितीत पालकांना योग्य मार्गदर्शनाची गरज ओळखून पांढरकवडा शहरात ‘सुजाण पालकत्व : बदलत्या काळात आपल्या मुलांना योग्य दिशा’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  या कार्यशाळेत प्रसिद्ध तज्ञ डॉ. गिरीश माने आणि डॉ. वृषाली माने पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा रविवार, 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता येथील मित्र क्रीडा मंडळ मैदानात पार पडणार आहे.
 
 
या कार्यक्रमात वर्ग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांच्या वाढत्या मानसिक ताणतणाव, अभ्यासातील अनास्था आणि तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे निर्माण होणाèया समस्यांवर उपयुक्त सल्ला मिळणार आहे. युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मदन जिद्देवार यांनी सर्व पालक, शिक्षक आणि सुज्ञ नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, तर आज त्यांच्यासोबत चालणं आणि त्यांना योग्य दिशा देणं आपली पालक म्हणून जबाबदारी आहे. प्रत्येक पालकाने यात सहभागी होऊन समाजात जागरूकतेचा संदेश द्यावा.
 
 
या कार्यशाळेत शहरातील विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार आहे. हे आयोजन सर्व शैक्षणिक संस्था, तालुका पांढरकवडा आणि युवा टायगर फोर्स, पांढरकवडा यांनी मिळून केले असल्याची माहिती युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0