तुझे तो कच्चा खा जाउंगी! पत्नीने पतीला प्रेयसीसह पकडले, चप्पलांनी केली मारहाण

28 Oct 2025 16:38:51
अमरोहा,
wife-caught-her-husband-with-lover अमरोहा जिल्ह्यातील दिदौली महामार्गावर असलेल्या एका गेस्टहाऊसमध्ये नाट्यमय घटना घडली. एका महिलेने तिच्या पतीला त्याच्या प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. दरवाजा उघडताच संतापलेल्या पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने पती व त्याच्या प्रेयसीवर हल्ला चढवला.
 
wife-caught-her-husband-with-lover
 
गेस्टहाऊसमध्ये तब्बल अर्धा तास हा हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू होता. गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावून आले. तथापि, माहिती मिळूनही पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केला नाही. wife-caught-her-husband-with-lover दरम्यान, गोंधळाच्या फायदा घेत पती घटनास्थळावरून पसार झाला. घटनेचा व्हिडिओ रात्री उशिरा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात पत्नीने पतीला चप्पलांनी बेदम मारताना दिसत आहे. तिच्या रागाने हॉटेलमधील वातावरणच तापले. काही लोकांनी मध्ये पडून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण महिलेचा संताप काही केल्या आटोक्यात येत नव्हता. संपूर्ण प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
Powered By Sangraha 9.0