यवतमाळात विदर्भस्तर खो-खो स्पर्धा

28 Oct 2025 18:11:41
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Vinayak Bodade : क्रीडा क्षेत्रात संपूर्ण राज्यात नावलौकिक असलेल्या यवतमाळ येथील नवजयहिंद मंडळाच्या वतीने 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत स्व. चिंतामणी पांडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विदर्भस्तर खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विनायक बोदडे यांनी दिली.
 
 
 
y28Oct-Bodade
 
 
 
पुढे बोलताना ते म्हणाले, अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणावर पार पडणाèया या स्पर्धेमध्ये संपूर्ण विदर्भातून पुरुष व महिलांचे 29 नामांकित संघ सहभागी होणार आहेत. सकाळी 7 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते रात्री 12 दरम्यान सामने खेळविले जाणार आहेत. नवजयहिंद मंडळामध्ये शेकडो खेळाडू कबड्डी, खो-खो आणि मल्लखांब या तीन देशी खेळांचा नियमित सराव करतात. या खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी मंडळाच्यावतीने वेळोवेळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
 
 
यंदा मंडळाने पुरुष व महिला संघांच्या खुल्या गटातील विदर्भस्तर खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये नागपूर शहर पोलिस, विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल, राजापेठ स्पोर्टिंग क्लब अमरावती, अनंत क्रीडा मंडळ अकोला, बुलढाणा जिल्हा खो-खो असोसिएशन, वत्सगुल क्रीडा मंडळ वाशीम, विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली, नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर, क्रांतीज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर, छत्रपती संभाजी क्रीडा मंडळ वरोरा, छत्रपती क्रीडा मंडळ नागपूर, तुळजाभवानी क्रीडा मंडळ परतवाडा, विदर्भ क्रीडा मंडळ काटोल, तुळजाई क्रीडा मंडळ खल्लार, शेषस्मृती क्रीडा मंडळ तळवेल, साई युवक क्रीडा मंडळ अमरावती, मराठा क्रीडा मंडळ अमरावती, ह्युमिनिटी क्रीडा मंडळ परतवाडा, तालुका क्रीडा संकुल वरोरा, सहयोग क्रीडा मंडळ हिंगणा, न्यु तुळजाई परतवाडा, फ्लाय क्रीडा मंडळ राळेगाव यासह नवजयहिंद मंडळ यवतमाळ अशा 29 संघांचा सहभाग राहणार आहे.
 
 
या सर्व सहभागी संघांच्या खेळाडूंची निवास आणि भोजन व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणावर मैदान तयार करण्यात आले असून प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाèया प्रत्येक खेळाडूला भेटवस्तू देण्यात येणार आहे.
 
 
स्पर्धेतील पुरुष व महिला दोन्ही विजयी संघांसाठी प्रत्येकी प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये, द्वितीय 31 हजार रुपये, तृतीय 21 हजार रुपये आणि चतुर्थ 11 हजार रुपये देण्यात येणार आहे. यासोबतच विजयी आणि उपविजयी संघातील प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार आहे.
 
 
सोबतच दोन्ही गटांसाठी उत्कृष्ट संरक्षक, आक्रमक आणि स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी स्पर्धेला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब दौलतकार, सचिव प्रशांत वानखडे, प्रा. विकास टोणे, प्रदीप वानखडे, अमोल बोदडे, अविनाश जोशी, प्राचार्य जयंत चतुर, सुनील वानखडे, विलास किनवटकर, कैलास शिंदे, लक्ष्मीकांत बल्लाळ, कैलास राऊत, सचिन दरेकर, अजय निनगुरकर, जुमू लालुवाले, पंकज रोहणकर, आशिष प्यारलेवार, अमोल ढोणे सामन्यांसाठी प्रयत्नशील आहेत.
वैदर्भीय स्टार खेळाडूंचा सहभाग
 
 
या स्पर्धेतील मुंबई टायटल स्पर्धेत सहभागी खेळाडू फैजान पठाण, लकी सिंगर, अल्टीमेट खो-खो स्पर्धेचा स्पर्धक मनोज घोटेकर, खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कोमल महाजन, श्रुती ढाकरगे, भारतीय खो-खो संघ प्रशिक्षण शिबिरात सहभागी ऐश्वर्या ढोके, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेते अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0