गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

28 Oct 2025 18:32:29
वणी,
Suicide Case : दामलेफैलातील रहिवासी संतोष वाढई या 40 वर्षीय युवकाने सोमवार, 27 ऑक्टोबर गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक संतोष वाढई मोलमजुरी करत होता. त्याची पत्नी घरकामासाठी जात होती. वाढई दांपत्याला अपत्य झाले नाही म्हणून त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता. मंगळवारी सकाळी संतोषची पत्नी कामावर गेली, तर मुलगा बाहेर खेळत होता. दरम्यान संतोषने फाट्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. संतोषने आत्महत्येचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप काही कळाले नाही.
 
 

jlkj 
Powered By Sangraha 9.0