नागपूर,
deadly weapon गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने घातक शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपीकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध मनाई आदेशाचे उल्लंघन आणि शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक २८ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास पोलीस ठाणे सदर हद्दीत करण्यात आली. पेट्रोलिंग दरम्यान पथकाला माहिती मिळाली की, मंगळवारी मच्छीबाजार रोड परिसरात स्वप्नील नावाचा युवक भातक शस्त्र घेऊन फिरत आहे.
त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता, एक इसम पळ काढण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आला. त्याने आपले नाव स्वप्नील मुरलीधर लोहये (वय २८, रा. सुंदरबाग, गड्डीगोदाम, नागपूर) असे सांगितले. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे लोखंडी तलवार आढळून आली. तलवार जप्त करण्यात आली असून आरोपी हा कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगत असल्याचे निष्पन्न झाले आहे.deadly weapon या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात कलम ४/२५ भा.ह.का. सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, सह पोलीस आयुक्त नविनचंद रेड्डो, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, उप आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकातील मसपोनि मंगला हरडे व त्यांच्या पथकाने केली.