पंजाबमध्ये आप नेत्यावर गोळीबार!

29 Oct 2025 17:54:44
चंदीगड,
AAP leader shot dead in Punjab पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नेते नितन नंदा यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला श्री आनंदपूर साहिब परिसरात झाला असून संपूर्ण प्रदेशात खळबळ उडाली आहे.
 
 
AAP leader shot dead in Punjab
 
मिळालेल्या माहितीनुसार, नितन नंदा हे एका लग्नसमारंभात उपस्थित असताना अचानक गोळीबार झाला. गोळी त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. उपस्थितांनी तातडीने त्यांना आनंदपूर साहिब येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना चंदीगड पीजीआय येथे हलवले.
 
 
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर सील केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत. प्राथमिक तपासानुसार, हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तथापि, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. नितन नंदा यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0