अन् पोलिसांनी नागपूर प्रवास टाळण्याचे केले आवाहन!

29 Oct 2025 20:18:02
वर्धा,
Nagpur road blockade माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार ट्रॅटर मोर्चा नागपुरात २८ रोजी धडकला. आंदोलकांनी नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी, हिंगणा, खापरी येथे आपला डेरा टाकल्याने वर्धा येथून नागपूरला जाणार्‍या एसटीची चाकेच थांबली आहे. हिंगणघाट आणि पुलगाव आगारातील ५ बसेस जामठा येथे अडकल्या असून एकाच दिवशी हिंगणघाट, पुलगाव आणि वर्धा आगाराला २ लाख ८५ हजारांवर फटका बसला आहे. वर्धा येथील धुनिवाले चौकात पोलिसांनी प्रवाशांना आजच्या दिवस प्रवास टाळण्याचे आवाहन केले.
 

Nagpur road blockade 
माजी राज्यमंत्री Nagpur road blockade बच्चू कडू यांच्या नेतृत्वात २८ रोजी पासुन आंदोलन सुरू आहे. आज दुसर्‍या दिवशी आंदोलनकर्त्यांनी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, बुटीबोरी व खापरी येथे रास्ता रोको सुरू केल्याने हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्ग, हिंगणा मार्गे नागपुरात जाणार्‍या हिंगणा-हिंगणी तर बुटीबोरी होत नागपुरात प्रवेश होणार्‍या बुटीबोरी-तुळजापूर व नागपूर-हैदराबाद मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वर्धा व इतर विभागाच्या सुमारे १५० बसफेर्‍या नागपूरसाठी धावतात. पण, आंदोलनामुळे या बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या. आज २९ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत काही बसेस हिंगणा-हिंगणी मार्गाने नागपूरसाठी सोडण्यात आल्या. पण, याही मार्गावर आंदोलनकर्त्यांनी जाम केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या.
 
 
 
पुलगाव आगारातून पुलगाव-नागपूर अशा नियोजित ६ फेर्‍या असतात. मात्र, दिवाळीनिमित्त या फेर्‍यांमध्ये वाढ करून १० ते १२ बसफेर्‍या वाढविण्यात आल्या होत्या. हिंगणघाट आगारातून जाणे-येणे ४२ फेर्‍या तर वर्धा आगारातून जाणे-येणे अशा ३० फेर्‍यांचे नियोजन होते. मात्र, आंदोलनामुळे रस्ते जाम झाल्याने या तीनही आगारातील सर्व बसफेर्‍या आज रद्द करण्यात आल्या. मंगळवारी हिंगणघाट आणि पुलगाव येथील निघालेल्या बसेस परतीच्या मार्गावर असताना रात्री आंदोलकांनी जामठा मार्गावर जाम केल्याने हिंगणघाट आगाराच्या ३ तर पुलगाव आगाराच्या २ बसेस अडकलेल्या आहेत. या बसेसमधील प्रवाशांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नसल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. अनेक प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने आपले किंवा नातेवाईकांचे घर गाठून या जाम मधून सुटका मिळविल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या बसेसमधील चालक-वाहक अद्यापही अन्न-पाण्याविना असल्याचीही रापमंच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
नांदेड-नागपूर बसेस गेल्या परत
नांदेड-नागपूर ही Nagpur road blockade लांबपल्ल्याची बस वर्धेहून जाते. या बसेस वर्धा येथे आल्या आणि येथूनच परत गेल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली. पांढरकवडा जवळचा करंजी मार्ग बंद असल्याने हिंगणघाट-पांढरकवडा ही बसफेरीही रद्द करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0