भाजपाच्या भाग्यश्री भोरे नप अध्यक्षपदासाठी इच्छुक

29 Oct 2025 20:54:18
जुना खेळाडू मैदानात उतरल्यामुळे राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता
महायुतीत राजकीय गणित म्हणून वास्तव समीकरणाला सुरुवात

हदगाव, 
आगामी हदगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत उमेदवारीसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत नप अध्यक्षपदासाठी ठोस उमेदवाराचे नाव न आल्याने चर्चा रंगली असतानाच, भाजपाच्या मजबूत व जुने कार्यकर्ते असलेल्या परिवारातून भाग्यश्री उमाकांत भोरे या नप अध्यक्षपदासाठी इच्छुक म्हणून पुढे आल्या आहेत. भाजपात बुद्धिजीवी वर्गाचा प्रभाव आणि संघटन कौशल्य हे पक्षाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. त्याच परंपरेला पुढे नेत Bhagyashree Bhore भाग्यश्री भोरे यांचा राजकीय वारसा आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी दृष्टीने बळकटी देणारी ठरत आहे.
 
 
Bhagyashree Bhore
 
Bhagyashree Bhore भाग्यश्री भोरे या हदगावातील विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक‘मांत सकि‘य असून, महिला मंडळ व समाजकार्यातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. त्यांनी ब‘ाह्मण समाजाच्या तालुका अध्यक्ष म्हणून समाजविकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. याशिवाय, जागतिक आरोग्य दिन आणि अन्य सामाजिक उपक‘मांमध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतल्याचे येते. त्यांचे पती उमाकांत भोरे हे भाजपाचे अत्यंत जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते असून, त्यांचा पक्षाशी असलेला संबंध १९९० पासूनचा आहे. ते अयोध्या चळवळीत कारसेवक म्हणून सहभागी झाले होते आणि त्यासाठी त्यांना वीस दिवस चित्रकूट जेलमध्ये शिक्षा भोगावी लागली होती.
 
 
 
नंतर १९९५ मध्ये ते भाजयुमो तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. त्यांनी भाजपा तालुका सरचिटणीस, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि सेवा सोसायटीचे संचालक अशा विविध पदांच्या जबाबदार्‍या यशस्वी पार पाडल्या आहेत. Bhagyashree Bhore भाग्यश्री भोरे यांच्यामुळे भाजपामध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात जुना खेळाडू पुन्हा मैदानात आल्याने राजकीय गणित बदलू शकते अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यांच्या अनुभवी परिवाराचा संघटनात्मक आधार आणि महिलांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेता, नप अध्यक्षपदाच्या स्पर्धेत त्यांची दावेदारी सध्या सर्वात मजबूत मानली जात आहे.
Powered By Sangraha 9.0