उपवर्गीकरण विरोधात आक्रोश मोर्चाचे आयोजन

29 Oct 2025 18:36:08
तभा वृत्तसेवा
भंडारा, 
bhandara-news : अनुसूचित जाती, जमाती उपवर्गीकरण समितीचे काम अंतिम टप्प्यात असून आगामी तीन महिन्यांत अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लागू करण्यात येणार असल्याचे समजते. या निर्णयाविरोधात भंडारा येथे आंबेडकरवादी संघटना व राजकीय पक्षांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन 31 ऑक्टोबर ला करण्यात आले आहे. सदर मोर्चा दसरा मैदान शास्त्री चौक येथून निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालय वर धडकणार आहे.
 
 
JLK
 
भंडारा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी जनता, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक एस.सी. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या सदस्यांनी पत्रपरिषदेतून केले आहे. पत्र परिषदेत प्रा.डॉ.राहुल मानकर, दिपक जनबंधु, मृणाल गोस्वामी, अचल मेश्राम, असित बागडे, रणजीत कोल्हटकर, पायल सतदेवे, डॉ.प्रवीण थुलकर, तथागत फुले, सचिन गेडाम, रवी भवसागर, युगांतर बारसागडे, चंद्रशेखर खोब्रागडे, प्रशिक चव्हाण, सम्यक गजभिये, आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0