नागपूर,
bawankule-and-bacchu-kadu नागपूरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नवी घडामोड मिळाली आहे. माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. अमरावती ते नागपूर असा मोर्चा काढण्यात आला असून, शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी रस्ते अडवण्यात आले आहेत. बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “मला नुकताच चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. bawankule-and-bacchu-kadu त्यांनी सांगितले की या विषयावर चर्चा करून आम्हाला लवकरच कळवले जाईल. त्यांनी हेही सुचवले की, आम्ही मुंबईला गेलो तर ४-५ तास लागतील, त्यामुळे वाटाघाटी स्थानिक पातळीवरच करण्यात याव्यात. आंदोलनादरम्यान काही अडचणी निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणावरही टाकली जाणार नाही.”

दरम्यान, प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन दुसऱ्या दिवशीही जोरात सुरू आहे. bawankule-and-bacchu-kadu शेतकरी तात्काळ आणि बिनशर्त कर्जमाफीची मागणी करत असून, त्यांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४४) अडवला आहे. या आंदोलनामुळे नागपूर शहर आणि आसपासच्या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, प्रशासन आणि पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.