नागपूर,
cpr-awareness-training राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक प्राणीशास्त्र विभागात सीपीआर जनजागृती सप्ताह अंतर्गत कंप्रेशन-ओन्ली कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागाच्या सभागृहात जनजागृती व प्रशिक्षण सत्र पार पडले. विभाग प्रमुख डॉ. वर्षा धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
एअरपोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशन, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नागपूर येथील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी प्रमुख तज्ञ म्हणून डॉ. साकेत पराशर, डॉ. अवंती गोखले, डॉ. हर्षिता मंदवा, नर्सिंग हेल्थ ऑफिसर शुभम थोम्बरे आणि हेल्थ इन्स्पेक्टर महेक वासनिक यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. वी. टी. धुर्वे यांच्यासह सीएचबी शिक्षकवृंद, संशोधक विद्यार्थी आणि एम.एस्सी. विद्यार्थी उपस्थित होते. मनपा मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट चे कीटकशास्त्रज्ञ डॉ. पवन चनकापूरे यावेळी उपस्थित होते. cpr-awareness-training सीपीआर पद्धतीद्वारे जीव वाचवणाऱ्या तंत्रांचे तज्ञ व्यक्तींनी प्रात्यक्षिक सादर केले. हृदयविकाराच्या आपत्कालीन प्रसंगी वेळेवर सीपीआर देण्याचे महत्त्व अधोरेखित करणारी शपथ सर्वांकडून घेण्यात आली. सत्र अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरले. ज्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांचे आपत्कालीन प्रतिसाद आणि मूलभूत जीवनरक्षक तंत्रांविषयीचे ज्ञान अधिक दृढ झाले.