दिनदयालनगरात काकडआरतीने गुंजतो भक्तिभावाचा नाद !

29 Oct 2025 16:21:10
नागपूर,
Deendayalnagar Nagpur कार्तिक मासाचे औचित्य साधून दिनदयालनगर येथील पांडुरंगेश्वर शिव मंदिरात दररोज सकाळची सुरुवात काकडआरतीने होत आहे. पहाटेच्या मंगलसमयी भाविक महिलांच्या भूपाळ्या आणि आरतीने परिसर भक्तिमय होतो.
 

78 
 
 
वर्षा देशपांडे, रंजना ढोले, शीला जोशी, वृशाली कातरकर, श्यामला पाठक, कोहळे आणि इतर भगिनी नियमित उपस्थित राहतात.
“उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख” या गणपतीच्या भूपाळीने आरतीची सुरुवात होते.Deendayalnagar Nagpur काकडा लावून पांडुरंगाचे मुख प्रक्षालन, पूजा, नैवेद्य, विडा अर्पण आणि देवांची अलंकार सजावट अशा पारंपरिक विधींनी आरती पार पडते.तुळशी आणि आवळीची पूजा आरती करून हा सोहळा संपन्न होतो. कार्तिक पौर्णिमेला त्रिपूर जाळून काकडआरतीची सांगता करण्यात येणार आहे.
सौजन्य:वर्षा देशपांडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0