देवा भाऊ फाऊंडेशन जिल्हा कार्यकारणी घोषित

29 Oct 2025 19:04:38
बुलढाणा, 
District Executive Committee : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक गजानन जोशी यांनी देवाभाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याची जंबो कार्यकारिणी घोषित केली होती या मध्ये सिद्धार्थ शर्मा यांची बुलढाणा लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली होती.
 
 
J LK
 
४८ लोकसभा क्षेत्रात शेकडो कार्यकर्त्यांची टीम उभी करून फाउंडेशनच्या सामाजिक व विकासात्मक कार्यांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या फाऊंडेशन च्या माध्यमातून होणार आहे.आगामी ६ महिन्याच्या काळात स्वदेशी, सहकार, उद्यमिता, स्वावलंबन याविषयावर मार्गक्रमण करणार आहे. बुलढाणा लोकसभा ची सर्वसमावेशक कार्यकारिणी सिद्धार्थ शर्मा यांनी जाहीर केली या कार्यकारणीत सिंदखेडराजा मतदार संघातून सहसमन्वयक शिवानंद आघाव,मेहकर मधून प्रल्हाद अण्णा लष्कर, चिखलीतून अजय कोठारी, बुलढाण्यातून आशिष व्यवहारे, मोताळातील प्रवीण जवरे, खामगावातील रोहन जैस्वाल यांचा समावेश आहे. तसेच लोकसभा सामाजिक कार्यसमिती मध्ये डॉ.वैभव इंगळे,सुंदर संचेती, सुधीर भालेराव,राजेश अग्रवाल,अक्षय दीक्षित,नंदू लवंगे,दत्ता घणोकार,सय्यद आसिफ,सचिन जोशी,धीरज सावरकर,नारायण तोंडीलायता, दत्तात्रय जेऊघाले,कुमार छाजेड,अक्षय घुगे,समाधान नागरे यांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0