तर्‍हाळा कंझरा-वनोजा परिसरातील शेतकर्‍यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

29 Oct 2025 18:09:05
मंगरुळनाथ,
farmers march : तालुक्यातील तर्‍हाळा कंझरा-वनोजा जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व गावांसह पारवा सर्कल मधील काही राहिलेल्या गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांनी मंगरुळनाथ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेतकर्‍यांनी तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले.
 
 
JK
 
मोर्चादरम्यान शेतकर्‍यांनी शासनाकडून लहान मुलांना दिल्या जाणार्‍या आहाराचे निकृष्ट दर्जाचे पाकिट फोडून दाखवले व आहारा ऐवजी डि.बी.टी द्वारे रक्कम द्या किंवा ही योजना बंद करा, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. शेतकर्‍यांनी पुढे म्हटले की, तालुक्यातील शेतरस्ते आणि पांदण रस्ते अत्यंत वाईट अवस्थेत असून त्यांची तातडीने मंजुरी व दुरुस्ती करावी.
 
 
वन्य प्राण्यांमुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांना तार-जाळीचे कुंपण सामूहिक पद्धतीने उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा आहार थांबवून त्याऐवजी डी.बी.टी. प्रणाली लागू करावी, असेही शेतकर्‍यांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जांचे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले पुनर्गठन रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली.
 
 
याप्रसंगी किशोर देशमुख, सागर म्हैसन,े रंजित गावंडे,आशिष राऊत, धीरज राऊत, शिवा गावंडे, दयाराम राऊत, राम राऊत, संजय मुळे, शत्रुघ्न ठाकरे, वसंतराव राऊत, गजानन जाधव, मदन गायकवाड, धर्मराज राजूरकर, बाळकृष्ण रोकडे,भूषण सुर्वे, पांडुरंग राऊत, वसंत राऊत, गोपाल सुर्वे, भीमराव कोकरे, शालिग्राम कोकरे, कोंडू खाडे, मदन राऊत, गोपाल वानखडे, गजानन फुके, ज्ञानेश्वर कातडे यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0