स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीला वेग

29 Oct 2025 16:39:05
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
local-government-elections : शहरात रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आगामी होणाèया जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे आयोजन रिपब्लिकन सेना हदगाव तालुका अध्यक्ष महेंद्र धोंगडे आणि शहराध्यक्ष चंद्रकांत भोरे यांच्या वतीने करण्यात आले होते.
 
 
y29Oct-Hadgav
 
 
या आढावा बैठकीला रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सचिव माधव जमदाडे, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव नरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष भालेराव, युवा जिल्हाध्यक्ष मुकेश सावते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यकर्त्यांना त्यांनी आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत मार्गदर्शन करत संघटनात्मक एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे महत्व अधोरेखित केले.
 
 
सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात महाराष्ट्र सचिव माधव जमदाडे, जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे आणि तालुकाध्यक्ष महेंद्र धोंगडे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.
 
 
रिपब्लिकन सेनेत प्रवेश करणाèयांमध्ये कुणाल देवाजी मुनेश्वर (हरडफ), बबन जमदाडे (उंचेगाव), सखाराम शिवाजी खांडेकर (बामणी), अनिल सिद्धार्थ प्रधान (कवाना), शिवशंकर गंगाधर सूर्यवंशी (कवाना), नागोराव लोणे (दिग्रस), विश्वंभर बोरकर (चोरंबा), संजय खंडूजी नरवाडे (वरवट), संभाजी मारुती पोत्रे (ठाकरवाडी), देविदास होलबोले (पळसा) यांचा समावेश आहे.
 
 
बैठकीत सर्व कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका ताकदीने लढविण्याचे आदेश व सूचना देण्यात आल्या. ही माहिती रिपब्लिकन सेना हदगाव तालुकाध्यक्ष महेंद्र धोंगडे यांनी दिली.
 
 
यावेळी उपस्थित पदाधिकाèयांमध्ये रिपब्लिकन सेनेचे हदगाव विधानसभा अध्यक्ष महेंद्र धोंगडे, शहराध्यक्ष चंद्रकांत भोरे, मीडिया तालुकाध्यक्ष मारोती काकडे, उपाध्यक्ष भगवान कदम, लक्ष्मण जमदाडे, नागनाथ मल्लिकार्जुन हुंडेकर, जनार्दन हटकर, शेषराव वाठोरे, विकास प्रधान, तालुका संघटक माधव आडागळे, तालुका विधी सल्लागार सदानंद गजभारे, तामसा शहराध्यक्ष इम्रान पटेल, तालुका उपाध्यक्ष भीमराव साळवे, पळसा सर्कल अध्यक्ष बालाजी जमदाडे, उपाध्यक्ष सत्यजित प्रधान तसेच विविध गावांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0