सियोल,
trump-praises-pm-modi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कौतुक केले आहे. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशिया-प्रशांत आर्थिक सहयोग (APEC) शिखर परिषदेपूर्वी दिलेल्या भाषणात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना “नाइस लुकिंग मॅन” म्हणजेच “सर्वात देखणे व्यक्ती” असे संबोधले. त्यांनी म्हटलं, “त्यांना पाहून असं वाटतं जणू ते तुमचे वडील असावेत, पण ते एक ‘किलर’ आहेत, म्हणजेच कठोर आणि मजबूत नेते.”

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारत-पाकिस्तान तणावाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “जर तुम्ही भारत आणि पाकिस्तानबद्दल बोलाल, तर मी त्या वेळी भारतासोबत व्यापार करार करत होतो. मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. त्या वेळी दोन्ही देश युद्धाच्या तयारीत होते. मी दोन्ही देशांच्या नेत्यांना सांगितले की जर त्यांनी लढाई सुरू ठेवली, तर अमेरिका त्यांच्याशी कोणताही व्यापार करणार नाही.” ट्रम्प यांनी दावा केला की त्यांच्या या हस्तक्षेपामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. मोदींच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, “तो सर्वात देखणा व्यक्ती आहे. त्यांना पाहून वाटते की ते शांत आणि समंजस आहेत, पण प्रत्यक्षात ते एक दमदार नेता आहेत. एकदा मोदी म्हणाले होते, ‘नाही, आम्ही लढू!’ तेव्हा मी स्वतःलाच विचारले, ‘हा तोच माणूस आहे का ज्याला मी ओळखतो?’” ट्रम्प यांनी पुढे सांगितले की मोदी त्यांचे “चांगले मित्र” आहेत आणि दोघांमधील नात खूप मजबूत आहे. trump-praises-pm-modi ट्रम्प यांचे हे भाषण दक्षिण कोरियातील सियोल येथे दिले गेले, जिथे त्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील व्यापार आणि ऊर्जा सहकार्यावर भर दिला. या दौऱ्यात ट्रम्प चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगसह अनेक जागतिक नेत्यांशी भेट घेणार आहेत.
या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारविषयक चर्चाही सुरू आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतीय आयातीवर ५० टक्क्यांपर्यंत कर लावण्याची घोषणा केली आहे, ज्यातील २५ टक्के टॅरिफ ऑगस्टपासून लागू केले गेले आहेत. हे टॅरिफ भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीवर लादले गेले आहेत. trump-praises-pm-modi भारताने आपल्या ऊर्जा धोरणाचं समर्थन करत सांगितले आहे की त्याचा तेल खरेदीचा निर्णय पूर्णतः आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजांवर आधारित आहे, कोणत्याही राजकीय दबावावर नाही. ट्रम्प यांचे हे वक्तव्य त्यांच्या अलीकडील भाष्यांपेक्षा वेगळ आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदींना “ग्रेट पर्सन” आणि “ग्रेट फ्रेंड” म्हटल होते. त्यांनी सांगितलं होत, “मी भारतातील जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो. आजच माझी पंतप्रधान मोदींशी उत्तम चर्चा झाली. ते एक अप्रतिम व्यक्तिमत्त्व आहेत आणि अनेक वर्षांपासून माझे चांगले मित्र आहेत.” ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही नेत्यांमध्ये मुख्य चर्चा व्यापारविषयक होती.