भारताने ताजिकिस्तानमधील एअरबेस केले रिकामी; मोठे बदलाचे संकेत

29 Oct 2025 12:10:16
नवी दिल्ली, 
india-vacates-airbase-in-tajikistan भारताने ताजिकिस्तानमधील आयनी हवाई तळ रिकामा केला आहे. जवळपास २५ वर्षांपासून भारत या तळाचे संचालन करत होता. आयनी हवाई तळ भारतीय सैन्य कारवायांसाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जात होता. ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा तळ सोव्हिएत संघाच्या काळात उभारला गेला होता. मात्र, १९९१ मध्ये सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर हा तळ ताजिकिस्तान सरकारच्या ताब्यात गेला.

india-vacates-airbase-in-tajikistan
फोटो सौजन्य : सोशल मीडिया 
 
सन २००२ मध्ये भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात झालेल्या रणनीतिक करारानंतर भारताने या हवाई तळाच्या पुनर्निर्माण आणि आधुनिकीकरणाची जबाबदारी स्वीकारली. भारतीय हवाई दलाने येथे मिग-२९ फायटर जेट्स, हेलिकॉप्टर, हॅंगर आणि रनवे सिस्टमचे उन्नतीकरण केले. या तळामुळे भारताची मध्य आशियातील उपस्थिती अधिक मजबूत झाली होती. आयनी हवाई तळामुळे भारताला अनेक सामरिक फायदे मिळत होते. हा तळ अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील सीमेपासून अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर होता, ज्यामुळे भारताला अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर थेट लक्ष ठेवणे शक्य होत होते. तसेच, पाकिस्तानच्या हालचालींवरही भारत येथेून नजर ठेवू शकत होता. ताजिकिस्तानची सीमा चीनच्या शिंजियांग प्रांताला लागून असल्याने या तळाचा उपयोग चीनच्या घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठीही केला जात होता. मात्र, अलीकडच्या वर्षांत ताजिकिस्तान सरकारने आपल्या देशातील परदेशी सैन्य उपस्थितीवर निर्बंध आणले आहेत. राष्ट्रपती इमामोली रहमान यांना त्यांच्या भूमीत कोणत्याही परदेशी सैन्याचा दीर्घकाळ मुक्काम नको आहे. india-vacates-airbase-in-tajikistan दुसरीकडे, भारत आता आपल्या संरक्षण धोरणाचा केंद्रबिंदू इंडो-पॅसिफिक क्षेत्राकडे वळवत आहे. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच्या ‘क्वाड’ गटाच्या माध्यमातून भारताचे लक्ष आता सागरी सुरक्षेकडे जास्त केंद्रित झाले आहे, मध्य आशियातील कायमस्वरूपी ठिकाणांपेक्षा. त्यामुळे आयनी हवाई तळ रिकामा करण्याचा निर्णय हा भारताच्या दीर्घकालीन रणनीतीशी सुसंगत मानला जातो.
भारताने ताजिकिस्तानसोबतचे संरक्षण आणि गुप्तचर सहकार्य कायम ठेवले आहे. त्याचबरोबर, भारत ईराणमधील चाबहार बंदर प्रकल्प आणि उत्तर-दक्षिण वाहतूक गलियारा यांसारख्या योजनांवर काम करत आहे, ज्यामुळे मध्य आशियाशी संपर्क टिकून आहे. आयनी हवाई तळ रिकामा होणे हे भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणात होणाऱ्या बदलाचे प्रतीक आहे. आता भारत भू-राजकीय प्रभाव टिकवण्यासाठी सैनिकी ठिकाणांवर अवलंबून न राहता कूटनीतिक, तांत्रिक आणि सागरी शक्तीच्या माध्यमातून आपले हित जपण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. india-vacates-airbase-in-tajikistan हे पाऊल मध्य आशियातील भारताची पकड थोडी शिथिल दर्शवू शकते, परंतु दीर्घकालीन दृष्टीकोनातून ही एक संतुलित आणि व्यवहार्य रणनीती असल्याचे मानले जाते.
Powered By Sangraha 9.0